There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
ऑटोमोबाइल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, एज्युकेशन, फूड प्रोसेसिंग, बँकिंग अॅँड फायनान्स, इन्शुरन्स, केमिकल्स आणि फार्मास्युटिकल, हेल्थ केअर, तसेच हॅँडलूम या आणि अशा ब-याचशा संघटित, असंघटित क्षेत्रामधील करिअरसाठी दिशा निवडून त्याप्रमाणे शिक्षण घ्यायला हवं. आजकाल दुरस्थ शिक्षण किंवा पत्राद्वारे शिक्षण किंवा पार्ट टाइम कोर्सेस, ऑन लाइन कोर्सेस असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा पुरेपूर फायदा विद्यार्थी मित्र घेऊ शकतात व आपल्या सध्याच्या नोकरी व्यवसायामध्ये व्हॅल्यू अॅडिशन करू शकतात. फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठाचीच निवड करायला हवी. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय अर्थात मिनिस्ट्री ऑफ एचआरडी किंवा यूजीसी अर्थात युनिव्हर्सिटी ग्रॅँट कमिशन किंवा डीटीई अर्थात डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन किंवा एआयसीटीई अर्थात ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन किंवा डेक अर्थात डिस्टन्स एज्युकेशन कौन्सिल या पैकी प्रमाणित केलेले असावे.
राज्य किंवा भारत सरकारच्या प्रामाणिकतेचा मात्र विचार करायलाच हवा कारण आजकाल खासगी विद्यापीठे किंवा खासगी संस्थांचे पेव फुटत चाललेले आहे. सगळ्याच खासगी संस्था सरसकट चांगल्या नसतात, असं अजिबात नाही. पण विद्यार्थ्यांनी स्वजबाबदारीवर प्रवेश घ्यावा किंवा प्रवेश घेण्यापूर्वी या गोष्टींचा विचार आवर्जून करावा. बरेचदा काही खासगी संस्था जगभरात विविध ठिकाणी मान्यताप्राप्त असू शकतात कार्पोरेट क्षेत्रामध्ये पण त्यांचा भारतीय विद्यापीठाच्या मान्यताप्राप्ततेशी संबंध नसते अशा वेळी तुम्हाला तुमच्या क्षेत्राचा आवाका लक्षात घेऊन प्रवेश घ्यायला हवा. नोकरीच्या दृष्टीने हा मुद्दा फार महत्त्वाचा होतो. मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून केलेला कोर्स बरेचदा भारतामधील नोक-यांसाठी उपयुक्त ठरतो. पण परदेशात तो ठरेलच याची शाश्वती नाही. अपवाद आयआयटी किंवा आयआयएम सारख्या संस्थांचा !
विलेपार्ले मुंबई येथील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अर्थात एनएमआयएमएसचे पूर्णवेळ, अर्धवेळ किंवा पत्राद्वारे असे अनेक अभ्यासक्रम आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. त्यांचा मुंबई व्यतिरिक्त एक कॅम्पस महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातसुद्धा आहे.
महाराष्ट्र सरकारचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. शिवाय मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठासह अण्णामलाई तामिळनाडू, गुजरात विद्यापीठ तसेच भारतातील ब-याचशा विद्यापीठांमधून हल्ली दुरस्थ शिक्षण किंवा ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा अर्धवेळ अभ्यासक्रम राबवले जातात.